केंव्हा पासून सुरुवात झाली ते आठवत नाही, पन "चित्रकारी" हिच माझी एकमेव ओळख होती. जीवनाच्या रहाट गाडग्यात हळुहळू "ती" पुसट होत गेली,..... पन आजही वेळ मिळेल तसा मी तीला जपायचा प्रयत्न करतो आहे.
माझ्या बद्दल फक्त "मीच" सत्य काय ते लिहू शकतो, जगाला दिसणारा मी आतून कैक वेगळा आहे. तसा सहज चार-चौघात न मिसळणारा, मिसळलो तरीही तरंगल्या सारखा. बऱ्याच गोष्टी कुणालाही न सांगता मनातच साठवणारा.. अगदी त्यांचा पाचोळा झाला तरी, वाऱ्याबरोबर उडून जाई पर्यंत... कुढणारा. आपल्याच तंद्रीत वावरणारा, इतका की जवळचेही माझ्यावर खालमुंड्या, घुम्या असले आरोप ठेवतात. पण तरीही,.... अजूनही मी तस्साच आहे.
1 comments:
Loved this painting...:)
very natural
Post a Comment