स्त्री - तैलचित्र.

१९९७ ची गोष्ट असेल, त्या वेळी मी दर गुरुवारी पुण्यातील टिळक रोड वरील चित्रकार चाफेकर सर (वय अंदाजे ८० वर्षे) यांच्या स्टुडिओमध्ये शिक्षणासाठी जायचो...
.


.
स्टुडिओच्या मुख्य दाराच्या मागेच एक चित्रांचे कैलेंडर लावलेले असायचे, त्यातच हे हि एक चित्र होते, मला ते प्रचंड आवडले होते....दररोज घरी जाताना ते मला खुणावायचे,... तसेच नव्हे तर तेच चित्र आपणही काढावे असे नेहमी वाटायचे, पण ते चित्र सर देतील की नाही हि शंका होती... शेवटी सदाचारी "मी" वर माझ्यातील चित्रकार स्वार झाला, एक दिवस मी स्टुडिओतून बाहेर पडताना कैंलेंडरवरिल ते चित्र फाडून घेतले, आणी धडक चोरून घरी घेऊन आलो... आणि लगेच कैनवास वर उतरवलेही.
.
प्रसिद्ध चित्रकार गोपाळ देवुस्कर यांनी हे तैल चित्र काढले होते, पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरातील "बालगंधर्वांची" दोन्ही व्यक्तिचित्रे त्यांनीच काढलेली आहेत. एक पुरुषवेशातिल तर एक स्त्री वेषातील.


पापांची वासना नको दांवू डोळा l त्याहुनि आंधळा बराच मी ll
निंदेचे श्रवण नको माझे कानी l बधिर करोनि ठेवी देवा ll
अपवित्र वाणी नको माझ्या मुखा l त्याजहुनि मुका बराच मी ll

तुका म्हणे मज अवघ्याचा कंटाळा l तू एक गोपाळा आवडसी ll
जिजाऊ साहेब भोसले !
शहजिराजे भोसले आणि मित्र मुरार जगदेव ...(आदिलशहाचा वझीर)

औरंग ........आम्हा हिंदूंचे परम पवित्र देवस्थान,काशीचे परम पवित्र, श्री शिवशंकराचे मंदिर तुम्ही धर्मांध बनून पाडले..... त्यावर मशीद उभी केली.पराक्रम थोर केला, एशा घमेंडित तुम्ही असाल.हा अभिमान लटका आहे हे थोड्याच दिवसात तुमच्या निदर्शनास येइल. ... तुम्ही उत्तरेत सत्ताधीश असाल, पण दक्षिणेत आमची सत्ता आहे हे विसरता.मनात आणले, तर दक्षिनेतिल प्रत्येक मशिदीचे मंदिर करायला वेळ किती ?
इस्लाम धर्म आम्ही तुमच्यापेक्षा जास्त जाणतो.माणुसकी जानीत नहीं तो धर्म कसला?. हिंदुन्ना जुल्माने बाटवीने,जिझीया कराची आकारनी करने हे इस्लाम च्या बंद्याला न शोभनारे वर्तन. ते तुम्ही करीत आहात ......आम्ही ते कदापिही सहन करणार नाही. इथे तर तुमचे राज्य नाहीच. पण जेथे आहात,ती ही पवित्र भूमी ही तुमची नाही.
एक ना एक दिवस तुमचे दिल्ली तख्त उखडून तुम्ही पाडलेल्या मंदिराची आम्ही उभारणी करू तेव्हाच आम्ही स्वस्थ बसु.
''आमचे वैर निभावन्यास परमेश्वर तुम्हास सामर्थ्य देवो''

स्वराज्याची पायाभरणी- शहाजीराजे भोसले.

इंद्र जिमि जृंभपर !बाडव सुअंभपर !
रावण सदंभपर !रघुकुल राज है !!

पौन वारिवाह पर !संभु रतिनाह पर !
ज्यो सहसवाह पर !राम द्विज राज है !

तेज तमंअंस पर ! कन्न्ह जिमि कंस पर !
त्यों म्लेंच्छ बंस पर !शेर शिवराज है !!

शेर शिवराज है !!शेर शिवराज है !!

--- कवीराज भूषण.

Blog Vishwa