.

.
स्टुडिओच्या मुख्य दाराच्या मागेच एक चित्रांचे कैलेंडर लावलेले असायचे, त्यातच हे हि एक चित्र होते, मला ते प्रचंड आवडले होते....दररोज घरी जाताना ते मला खुणावायचे,... तसेच नव्हे तर तेच चित्र आपणही काढावे असे नेहमी वाटायचे, पण ते चित्र सर देतील की नाही हि शंका होती... शेवटी सदाचारी "मी" वर माझ्यातील चित्रकार स्वार झाला, एक दिवस मी स्टुडिओतून बाहेर पडताना कैंलेंडरवरिल ते चित्र फाडून घेतले, आणी धडक चोरून घरी घेऊन आलो... आणि लगेच कैनवास वर उतरवलेही.
.
प्रसिद्ध चित्रकार गोपाळ देवुस्कर यांनी हे तैल चित्र काढले होते, पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरातील "बालगंधर्वांची" दोन्ही व्यक्तिचित्रे त्यांनीच काढलेली आहेत. एक पुरुषवेशातिल तर एक स्त्री वेषातील.